Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आजचा दिवस ठरणार भाग्यवान! तुमच्या राशीला मिळत आहेत ‘हे’ महत्वाचे संकेत; वाचा राशीभविष्य

Horoscope 29 May 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात भागीदारीत काम करत असाल तर नफा होईल. धनलाभाचे योग आहेत.

वृषभ

वृषभ

वृषभ : नोकरीत आज सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळा. व्यापाऱ्यांनी कोणताही मोठा व्यवहार करताना कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

मिथुन

मिथुन

मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत भाग्याचा आहे. नोकरीत बढती किंवा पगारात वाढ होण्याचे संकेत आहेत.

कर्क

कर्क

कर्क : नोकरीत कामाचा ताण थोडा वाढूशकतो, मेहनतीचे फळ नक्की मिळेल. परदेशात नोकरी, शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल.

सिंह

सिंह

सिंह : नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज चांगली संधी चालून येईल. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये यश मिळू शकते.

कन्या

कन्या

कन्या : बोलण्याच्या जोरावर तुम्ही कठीण कामेही सहज पूर्ण कराल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. थकीत पेमेंट परत मिळू शकते.

तूळ

तूळ

तूळ : कार्यक्षेत्रात नवीन कल्पना अंमलात आणाल, ज्यामुळे तुमच्या कामाचा दर्जा सुधारेल. व्यापाराचा विस्तार होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : नोकरीत कामाचा बोजा जास्त राहील, त्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. शत्रूपासून सावध राहा, ते कामात अडथळे करू शकतात.

धनु

धनु

धनु : व्यावसायिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. नवीन कंत्राट किंवा व्यावसायिक भागीदारीसाठी दिवस अनुकूल आहे.

मकर

मकर

मकर : बेरोजगार तरुणांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यापारी वर्गाला मोठी ऑर्डर मिळून मोठा नफा कमावता येईल.

कुंभ

कुंभ

कुंभ : रेंगाळलेली कामे सहज पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खूश राहतील. कुटुंबासह प्रवासाचे नियोजन कराल.

मीन

मीन

मीन : कामाच्या ठिकाणी घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. विरोधक सक्रिय राहतील, त्यामुळे तुमचे काम चोख ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT