Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज 'या' राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहारात घाई टाळा; पाहा १२ राशींचे अचूक भविष्य

Horoscope 29 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : आज कामात उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते. आर्थिक व्यवहारात घाई टाळा.

वृषभ

वृषभ

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेता येतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

मिथुन

मिथुन

मिथुन : संवाद-कौशल्याचा चांगला फायदा होईल. नवीन व्यक्तींशी संपर्क वाढेल. प्रवासाची शक्यता असून तो लाभदायक ठरू शकतो.

कर्क

कर्क

कर्क : घरगुती वातावरण आनंदी राहील. महत्त्वाच्या कामात वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत.

सिंह

सिंह

सिंह : आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण कराल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. मानसन्मान वाढेल. खर्च करताना गरजांचा विचार करा.

कन्या

कन्या

कन्या : नियोजनबद्ध कामामुळे चांगले परिणाम मिळतील. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. मन प्रसन्न होईल.

तूळ

तूळ

तूळ : निर्णय घेताना दोन्ही बाजूंचा विचार करा. भागीदारीत फायदा होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राकडून महत्त्वाची माहिती मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. व्यवसायातील अडचण दूर होऊ शकते. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल.

धनु

धनु

धनू : नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस चांगला. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल. संपर्कातून लाभ होऊ शकतो.

मकर

मकर

मकर : कामाचा ताण वाढू शकतो. नियोजन महत्त्वाचे ठरेल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील.

कुंभ

कुंभ

कुंभ : कल्पनांना प्रतिसाद मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता असून बचतीला प्राधान्य द्या. मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते.

मीन

मीन

मीन : संभ्रम दूर होऊन निर्णय घेणे सोपे जाईल. कुटुंबातून भावनिक आधार मिळेल. कामात सातत्य ठेवल्यास यश मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT