Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस. निर्णय योग्य ठरतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
वृषभ : आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. जुने काम पूर्ण करण्यावर भर द्या. अनावश्यक खर्च टाळा.
मिथुन : संवाद कौशल्यामुळे फायदा होईल. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. मन थोडे चंचल राहू शकते. धैर्यान निर्णय घ्या.
कर्क : भावनिक बाबतीत संवेदनशीलता वाढेल. घरगुती वातावरण शांत राहील. कामात थोडा ताण येऊ शकतो. विश्रांती घेणे गरजेचे आहे.
सिंह : नेतृत्वगुण दिसून येतील. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून मदत मिळेल. शक्यतो अहंकार टाळा.
कन्या : योजना आखून काम केल्यास यश मिळेल. आरोग्य सुधारण्यावर लक्ष द्या. लहान सहलीचा योग आहे. कामात अचूकता ठेवा.
तूळ : संबंध सुधारण्याचा दिवस आहे. भागीदारीत मोठा लाभहोईल. निर्णय घेताना समतोल राखा. मन प्रसन्न राहील.
वृश्चिक : गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. कामात प्रगती होईल. ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत सावध राहा.
धनु : प्रवासाचा योग आहे. नवीन संधी मिळू शकतात. शिक्षण आणि ज्ञान वाढेल. नेहमी आशावादी राहा.
मकर : जबाबदाऱ्या वाढतील. कामात मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आरोग्य सांभाळा.
कुंभ भ: नवीन कल्पना सुचतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. सर्जनशील कामात यश मिळेल. मन शांत ठेवा.
मीन : आर्थिक लाभाचा योग आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मनातील गोष्टी व्यक्त करा. आत्मविश्वास वाढेल.