मकर : वरिष्ठ किंवा घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. सामाजिक कामात सक्रिय राहाल. मालमत्ता किंवा घरगुती कामांसाठी खर्चाची शक्यता.
Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : रखडलेली कामे मार्गी लागतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे; परंतु अनावश्यक खर्च टाळा. उत्साह चांगला राहील.
वृषभ : कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. शांततेने निर्णय घेणे फायद्याचे ठरेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे; मात्र घाईगडबड करू नका.
मिथुन : नवीन ओळखी लाभदायक ठरतील. संवादातील गोडवा कामे सोपी करेल. आर्थिक आवक समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होऊ शकतात.
कर्क : घरात आनंदी वातावरण राहील. प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरगुती सुखसोयींवर खर्च होण्याची शक्यता आहे.
सिंह : तुमचा आत्मविश्वास आणि प्रभाव वाढेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.
कन्या : नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. बौद्धिक कामात विशेष गती मिळेल. बचतीवर भर देणे शक्य होईल. अनावश्यक खरेदी टाळाल.
तूळ : भागीदारी किंवा सहकायनि केलेली कामे यशस्वी ठरतील. मतभेद मिटतील. आर्थिक स्थिती समतोल राहील. मनोरंजनावर थोडा खर्च होऊ शकतो.
वृश्चिक : जुन्या वादांपासून दूर राहा. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक ठरेल. पैशांचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.
धनू : लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यात रुची वाढेल. उत्पन्नाचे नवे मार्ग समोर येतील. ऊर्जा उत्तम राहील.
मकर : वरिष्ठ किंवा घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. सामाजिक कामात सक्रिय राहाल. मालमत्ता किंवा घरगुती कामांसाठी खर्चाची शक्यता.
कुंभ : नव्या कल्पना अमलात आणण्यासाठी दिवस उत्तम आहे. मित्रांची साथ मिळेल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहू नये याकडे लक्ष द्या.
मीन : भावनिक निर्णय घेणे टाळा. दिवस सकारात्मक आणि शांततेचा जाईल. दानधर्म किंवा सत्कार्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे.