Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi  AI Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 27 July 2025 | 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ आणि प्रेमाच्या द़ृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

 मेष

मेष

मेष ः पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. चांगल्या मित्रांना बोलवा. कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल.

वृषभ

वृषभ

वृषभ ः कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे.

मिथुन

मिथुन

मिथुन ः पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. शेजार्‍याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल.

कर्क

कर्क

कर्क ः तुम्ही एकटे असाल; परंतु शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो.

सिंह

सिंह

सिंह ः कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल.

कन्या

कन्या

कन्या ः मतभिन्नता आणि दडपण यामुळे बैचेन व्हाल. तुम्ही जीवनात पैशाची किंमत मानत नाही; परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते .

तूळ

तूळ

तूळ ः ध्येयं, उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. ती साध्य करण्यासाठी न थांबता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करा.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक ः तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. आज स्वयंसेवी कामाचा उपयोग स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल.

धनु

धनु

धनु ः आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या यशाचा अभिमान वाटेल. तुमच्या प्रेमाच्या द़ृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे.

मकर

मकर

मकर ः अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा.

कुंभ

कुंभ

कुंभ ः दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र-मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे.

मीन

मीन

मीन ः आपल्या गरजेच्या कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच काढाल. कामाच्या ठिकाणी आज तुमची एका छान व्यक्तीशी ओळख होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT