Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: भावनेपेक्षा परिस्थितीचा विचार करा; या २ राशीच्या लोकांनी आज काळजी घ्यावी

Horoscope 26 September 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : एखाद्या जुन्या प्रयत्नाला यशाची दिशा मिळेल. नातेवाईकांकडून एखादी महत्त्वाची माहिती मिळेल. मनाला समाधान देणारा प्रसंग घडेल.

वृषभ

वृषभ

वृषभ : घरातील प्रश्न सहज सुटू शकतो. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. बचतीसंबंधी नवीन निर्णय घेण्यासाठी वेळ द्या.

मिथुन

मिथुन

मिथुन : अचानक योजना बदलावी लागू शकते. नवीन व्यक्तीशी झालेली ओळख पुढे उपयोगी पडेल. कागदपत्रांशी संबंधित कामात काळजी घ्या.

कर्क

कर्क

कर्क : घराच्या दृष्टीने चांगली घडामोड होईल. जवळच्या व्यक्तीचा सल्ला मनापासून पटेल. मनातील चिंता दूर करणारी बातमी मिळेल.

सिंह

सिंह

सिंह : निर्णयक्षमतेची कसोटी लागेल. एखादे महत्त्वाचे काम तुमच्यावर सोपवले जाईल. व्यवहारातून अनपेक्षित फायदा होऊ शकतो.

कन्या

कन्या

कन्या : छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करणे महत्त्वाचे ठरेल. व्यवहारातील एखादी चूक वेळीच लक्षात येईल. नियोजन महत्त्वाचे ठरेल.

तूळ

तूळ

तूळ : आज तुमच्या संयमी स्वभावाचा फायदा होईल. घरातील वातावरण बदलण्यासाठी एखादी कल्पना सुचेल. मन प्रसन्न होईल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसमोर तुमचे मत मांडाल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा विचार पुन्हा कराल. धावपळ होईल.

धनु

धनु

धनू : आज एखाद्या ठिकाणी जाण्याचा अचानक योग येईल. नवीन शिकण्याची संधी तुमच्यासमोर येईल. गैरसमज दूर होईल.

मकर

मकर

मकर : आज कामापेक्षा नियोजनावर अधिक भर द्या. घरातील एखादी वस्तू किंवा जागा बदलण्याचा विचार कराल.

कुंभ

कुंभ

कुंभ : आज एखाद्या व्यक्तीचे खरे मत समजून येईल. तुमच्या कल्पनेला प्रत्यक्ष रूप देण्याची सुरुवात होईल. मित्र मदत करतील.

मीन

मीन

मीन : आज भावनेपेक्षा परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्या. एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. पत्रव्यवहार कराल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT