Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : ताजा अर्थपुरवठा होईल. घरातील सणांचे-उत्सवाचे वातावरण दडपण कमी करेल. केवळ बघ्याची भूमिका न बजावता कार्यक्रमात सहभागी व्हा.
वृषभ : चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. तुमची स्थिती काय आहे, हे प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील.
मिथुन : आई-वडिलांच्या आरोग्यावर अधिक खर्च करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती बिघडेल; परंतु नात्यामध्ये मजबुती येईल.
कर्क : एखाद्या आनंदी-प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल.
सिंह : जीवनसाथीचा प्रेमळ मूड तुमचा दिवस उजळून टाकेल. दिवस शुभआहे. चिरंतन मूल्य राहील, अशा वस्तू खरेदी करा.
कन्या : कुणाच्या मदती विना तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. अनुकंपेचा गुण आणि समजूतदारपणा याची गोमटी फळे मिळतील.
तूळ : पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल.
वृश्चिक : वैवाहिक आयुष्याचे निश्चित फायदे असतात. आज अनुभव येईल. चांगले मित्र साथ सोडत नाहीत, ही गोष्ट आज समजेल.
धनु : लोक काय विचार करतात, त्याची चिंता करू नका. जर तुम्ही योग्य आहात, तर तुमचे कुणीच काहीच बिघडवू शकत नाहीत.
मकर : जबाबदारी स्वीकारून योग्य प्रकारे पार पाडण्याची तयारी ठेवा. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी राहा आणि धैर्य बाळगा.
कुंभ : कुटुंबासोबत बसून महत्त्वाच्या निर्णयाला शेवटचे रूप दिले जाऊ शकते. ही योग्य वेळ आहे. हा निर्णय लाभदायक सिद्ध होईल.
मीन : वागण्याबद्दल कौतुक होईल. लोक स्तुतिसुमने उधळतील. महत्त्वाच्या व्यक्ती आर्थिक मदत द्यायला तयार असतील.