Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवीन कामाची सुरुवात करण्यास चांगला दिवस. ऑफिसमध्ये निर्णयांना पाठिंबा मिळेल. कुटुंबामुळे मन प्रसन्न राहील.
वृषभ : कामात स्थिरता मिळेल, मानसिक ताण जाणवेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये संयम ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
मिथुन : नवीन ओळखी उपयोगी ठरतील. व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत. प्रवासाचा योग संभवतो, जो लाभदायक ठरेल,
कर्क : भावनिक निर्णय टाळा, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. कामात उशीर होऊ शकतो, पण शेवटी यश मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील.
सिंह : नेतृत्वगुण आज चमकतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. आरोग्य उत्तम राहील.
कन्या: कामाचा ताण वाढू शकतो. संयम ठेवल्यास यश मिळेल. सहकाऱ्यांशी वाद टाळा, खर्चावर नियंत्रण ठेवा, ध्यान उपयोगी ठरेल.
तूळ : दिवस संतुलित राहील. प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता. आर्थिक लाभ मिळू शकतो. मित्रांसोबत आनंददायी वेळ जाईल.
वृश्चिक : गुप्त योजना यशस्वी ठरू शकतात. कामात प्रगती दिसेल, पण घाई करू नका. नात्यांमध्ये विश्वास ठेवणे महत्त्वाचे. आरोग्याची काळजी घ्या.
धनु : नवीन संधी मिळतील. प्रवासाचे योग आहेत. शिक्षण किंवा अभ्यासात चांगली प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल,
मकर : कामावर लक्ष केंद्रित राहील, विश्रांती न घेतल्यास थकवा जाणवू शकतो. संतुलन राखणे गरजेचे. आर्थिक बाबतीत सावध राहा.
मकर : जबाबदाऱ्या वाढतील. तुम्ही त्यांना समर्थपणे सांभाळाल. आर्थिक लाभाची शक्यता. कुटुंबात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
मीन : मन चंचल राहू शकते. कामात लक्ष केंद्रित करणे गरजेचे. आर्थिक बाबतीत धोका टाळा. अध्यात्मिक ओढ वाढेल.