Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : व्यावसायिक भागीदारांसह किंवा नातेसंबंधांमध्ये काही संवेदनशील विषयांवर बोलताना स्पष्टता ठेवा. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद टाळा.
वृषभ : दैनंदिन जबाबदाऱ्या आणि कामाच्या ठिकाणच्या संभाषणावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल. सोप्या वाटणाऱ्या कामांमध्येही काळजी घेणे फायद्याचे ठरेल.
मिथुन : गुंतवणुकीशी संबंधित निर्णयांचा आढावा घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांनी तयारीवर अवलंबून न राहता सखोल उजळणी करावी.
कर्क : कौटुंबिक चर्चा आणि घराच्या किंवा मालमत्तेशी संबंधित विषयांवर लक्ष द्यावे लागेल. कागदपत्रे काळजीपूर्वक तपासावीत. ताणतणाव टाळा.
सिंह : संवाद साधताना, छोटे प्रवास करताना किंवा कागदपत्रांचे काम करताना विशेष सतर्क राहा. घाईघाईने कोणतेही संदेश किंवा निर्णय घेणे टाळा.
कन्या : आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यात पथ्य पाळा.
तूळ : स्वभावात संयम ठेवावा लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराशी संवाद साधताना गोडवा ठेवा, त्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील.
वृश्चिक : जुन्या कर्जातून किंवा आर्थिक विवंचनेतून सुटका होण्यासाठी योग्य योजना आखावी लागेल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
धनू : मित्रांचे सहकार्य लाभेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
मकर : करिअर आणि व्यवसायात मोठी भरारी घेण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. सामाजिक कार्यात मान-सन्मान वाढेल.
कुंभ : भाग्याची साथ लाभेल. सरकारी कामे मार्गी लागतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. मन प्रसन्न राहील.
मीन : आरोग्याच्या दृष्टीने दिवस संमिश्र असू शकतो, खाण्यापिण्याची काळजी घ्या. अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात, म्हणून बजेट सांभाळणे फायद्याचे ठरेल.