कुंभ : घर आणि कुटुंबाला अधिक वेळ द्याल. मालमत्तेसंबंधी कामात प्रगती होईल. नोकरीत संयमाने निर्णय घ्या.
Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामातील रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ : आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
मिथुन : कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परदेशाशी संबंधित कामांना गती मिळेल.
कर्क : उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. मित्रांकडून सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सिंह : कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक सकारात्मक घडामोडी होतील.
कन्या : नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक नियोजनाला महत्त्व द्या.
तूळ : अचानक एखादी आनंदाची बातमी मिळेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. जोडीदाराशी संवाद वाढवणे फायदेशीर ठरेल.
वृश्चिक : भागीदारीत यश मिळू शकते. नोकरीत नवीन संधी निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल.
धनू : कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. खर्च आणि बचत यांचा समतोल राखा.
मकर : नवीन काम सुरू करण्यासाठी नियोजन करा. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात आनंदाचे वातावरण राहील.
कुंभ : घर आणि कुटुंबाला अधिक वेळ द्याल. मालमत्तेसंबंधी कामात प्रगती होईल. नोकरीत संयमाने निर्णय घ्या.
मीन : धाडसी निर्णयातून फायदा होऊ शकतो. भावंडांचे सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.