Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल; पाहा संपूर्ण राशिभविष्य

Horoscope 25 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : जुन्या कल्पनेला नवी दिशा मिळेल. कामातील अडथळा शांतपणे हाताळा. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरू शकतो.

वृषभ

वृषभ

वृषभ : अनपेक्षित भेट किंवा फोन दिवसाची दिशा बदलू शकतो. आर्थिक बाबतीत छोटा फायदा होईल. संयमी निर्णय फायदेशीर ठरेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन व्यक्तीशी झालेली ओळख उपयोगी पडेल. अर्धवट काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. शब्द जपून वापरा, गैरसमज टाळता येतील.

कर्क

कर्क

कर्क : संभ्रम दूर करण्यासाठी योग्य वेळ आहे. कुटुंबातील व्यक्त्ती तुमची साथ देईल. कामात अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

सिंह

सिंह

सिंह : स्वतःला सिद्ध करण्याची संधी अचानक मिळू शकते. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. चांगली बातमी मिळेल.

कन्या

कन्या

कन्या : छोट्या तपशीलाकडे लक्ष दिल्याने मोठी चूक टळेल. नवे काम स्वीकारण्यापूर्वी वेळेचे नियोजन करा. उपयुक्त माहिती मिळू शकते.

तूळ

तूळ

तूळ : रखडलेल्या चर्चेला सकारात्मक वळण मिळेल. नात्यांमध्ये जवळीक वाढेल. तुमची कल्पना पसंत होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : एखादे गुपित किंवा महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. धाडसी निर्णय योग्य ठरण्याची शक्यता. भावनांकडे दुर्लक्ष करू नका.

धनु

धनु

धनू : नेहमीच्या पद्धतीऐवजी वेगळा मार्ग फायदेशीर ठरेल. प्रवासातून नवी संधी मिळू शकते. अति आत्मविश्वास मात्र टाळा.

मकर

मकर

मकर : संयम तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. कामात जबाबदारी वाढली तरी त्यातून प्रतिष्ठा मिळेल. जुन्या समस्येवर तोडगा सापडेल.

कुंभ

कुंभ

कुंभ : अचानक सुचलेली कल्पना मोठी ठरू शकते. नव्या संपर्कातून कामाची संधी निर्माण होईल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.

मीन

मीन

मीन : अंतर्मनाचा आवाज निर्णयात मार्गदर्शक ठरेल. रखडलेली गोष्ट पुन्हा पुढे सरकेल. सकारात्मक संदेश मिळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT