Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi  AI Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 24 November 2025: प्रेम, करिअर आणि पैसा: तुमच्या राशीसाठी आज काय आहे? एका क्लिकमध्ये संपूर्ण कुंडली!

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. व्यापारात नफा चेहऱ्यावर आनंद आणेल. घरातील वातावरणात उपयुक्त बदल कराल.

वृषभ

वृषभ

वृषभ : धनलाभहोण्याची शक्यता, वाईट सवयींच्या व्यक्तींपासून दूर राहा. तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही.

मिथुन

मिथुन

मिथुन : मनःशांती ढळेल. कुटुंबातील सदस्य अपेक्षा पुऱ्या करू शकणार नाहीत. इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे, अशी अपेक्षा धरू नका.

कर्क

कर्क

कर्क : गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन योजना, प्रकल्प पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे.

सिंह

सिंह

सिंह : तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील म्हणून अवतीभवतीच्या माणसांकडे बारकाईने लक्ष ठेवा.

कन्या

कन्या

कन्या : आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो.

तूळ

तूळ

तूळ : आजचा दिवस सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही. तुम्ही छोट्या गोष्टींमुळे त्रासून जाल. धनाने जोडलेल्या गोष्टीने मार्ग निघू शकतो.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : जीवनाला एक चांगला छान ताल येऊ द्या, त्यागाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा.

धनु

धनु

धनु : स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे बनेल. आज अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खूश करण्याची अनेक कारणे आहेत.

मकर

मकर

मकर : आत्मविश्वास हरवू नका. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करा. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ.

कुंभ

कुंभ

कुंभ : आशावादी राहा आणि उजळ बाजूकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे स्वप्ने प्रत्यक्षात येतील.

मीन

मीन

मीन : जवळच्या माणसांबरोबर वादविवाद छेडू नका. वादग्रस्त मुद्दे असतील तर ते संमतीने सोडवता येतात. अपयशातून तुम्ही धडे घ्याल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT