Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : व्यावसायिक कामात यश मिळेल. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. धनलाभाचे चांगले योग आहेत.
वृषभ : घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील. शांत डोक्याने कामे हाताळा.
मिथुन : रखडलेली कामे तुमच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन ग्राहक मिळतील. भागीदारीच्या कामात फायदा होईल. नोकरीत तुमचे कौतुक होईल.
कर्क : आज तुम्हाला संभाषणात आणि वागण्यात गोडवा ठेवावा लागेल. वादापासून दूर राहणे हिताचे ठरेल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका.
सिंह : चंद्र आज तुमच्याच राशीत असल्याने तुमचे व्यक्तिमत्त्व चमकेल. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरीत मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत.
कन्या : आजचा दिवस धावपळीचा आणि खर्चाचा ठरू शकतो. महत्त्वाचे निर्णय उद्यावर ढकलणे योग्य राहील. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूपासून सावध राहा.
तूळ : व्यवसायात मोठी प्रगती होईत भविष्यात फायदा होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
वृश्चिक : कर्मभावात चंद्र असल्याने तुमचे पूर्ण लक्ष कामावर केंद्रित असेल. कष्टाचे योग्य फळ मिळेल. जुने कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. पालकांचे आशीर्वाद मिळतील.
धनु : धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. एखादा छोटा प्रवास घडू शकतो. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.
मकर : कामाच्या ठिकाणी कोणत्याही वादात पडू नका. नवीन काम किंवा नवीन व्यवसाय आज सुरू करू नका. सट्टा, लॉटरी किंवा जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहा.
कुंभ : आजचा दिवस आनंददायी राहील. लोकांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल. भागीदारीच्या व्यवसायात मोठा नफा होईल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
मीन : नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल. कठीण कामेही तुम्ही सहज पूर्ण कराल. व्यापारामध्ये स्पर्धा असली, तरी तुम्ही पुढे राहाल. जुने घेतलेले कर्ज फेडण्यात यश येईल.