Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामाच्या ठिकाणी तुमची ऊर्जा आणि नेतृत्व गुण ठळकपणे दिसून येतील. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस.
वृषभ : व्यवसायात स्थिरता लाभेल. नवीन गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. मित्रांच्या सहकार्याने एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल.
मिथुन : सर्जनशील कामासाठी उत्तम दिवस. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रीत करता येईल. प्रवासाचा योग आहे. आर्थिक लाभाची शक्यता.
कर्क : घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. भावनिक निर्णय टाळा. नोकरीत वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.
सिंह : प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढण्याची शक्यता. नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी अनुकूल वेळ. जोडीदाराशी संवादात स्पष्टता ठेवा.
कन्या : कामात बारकाई आवश्यक. आरोग्याची काळजी घ्या. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
तूळ : नवीन ओळखी लाभदायक ठरतील. भागीदारीत काम करणाऱ्यांना यश. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक घडामोडी.
वृश्चिक : कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये घाई करू नका. नोकरीत बदलाचा विचार पुढे ढकला. आरोग्य सांभाळा.
धनु : प्रवास, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी शुभ दिवस. आर्थिक स्थितीत सुधारणा. मित्रांसोबत आनंददायी वेळ जाईल.
मकर : कुटुंबीयांशी संवाद साधताना सौम्य भाषा वापरा. संयम ठेवल्यास यश निश्चित. मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील.
कुंभ : नवीन संधी मिळण्याची शक्यता. सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग. खर्च वाढू शकतो, नियोजन आवश्यक.
मीन : आर्थिक लाभाचा दिवस आहे. सर्जनशील कल्पनांना वाव मिळेल. नातेसंबंध दृढ होतील. आरोग्य समाधानकारक राहील.