Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 24 April 2026: कोणासाठी आहे अचानक धनलाभाचा योग... जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

Anirudha Sankpal

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात.

वृषभ

वृषभ

वृषभ : सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात भागीदारीतून लाभ होईल. घरासाठी किंवा सुखसोयींसाठी खर्च होण्याची शक्यता आहे.

मिथुन

मिथुन

मिथुन : तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्यामुळे कठीण कामे सोपी होतील. पदोन्नतीचे संकेत आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

कर्क

कर्क

कर्क : कामाचा ताण वाढू शकतो. विरोधकांपासून सावध राहा. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. मानसिक शांततेसाठी योगा, ध्यान धारणा करा.

सिंह

सिंह

सिंह : समाजात आणि कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. तुमची निर्णयक्षमता वाखाणण्याजोगी असेल. पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्या.

कन्या

कन्या

कन्या : रखडलेली कामे पूर्ण होतील. परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल. शेअर मार्केट किंवा लॉटरीमधून अचानक धनलाभ होऊ शकतो.

तूळ

तूळ

तूळ : भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. नोकरीत बदल करण्यासाठी काळ अनुकूल आहे.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : कष्टाचे फळ मिळण्यास थोडा उशीर होईल, पण संयम ठेवा. गुप्त शत्रूवर विजय मिळवाल. बचतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

धनु

धनु

धनु : नशिबाची पूर्ण साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगतीचा दिवस आहे. धार्मिक कार्यावर खर्च होईल. सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

मकर

मकर

मकर : नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कष्टाच्या जोरावर उद्दिष्ट पूर्ण कराल. जमीन, मालमत्तेचे व्यवहार लाभदायक ठरतील.

कुंभ

कुंभ

कुंभ : कल्पक विचारांमुळे वरिष्ठांकडून कौतुक होईल. अचानक खर्च उद्भवल्यामुळे तणाव येऊ शकतो. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

मीन

मीन

मीन : तुमची मते स्पष्टपणे मांडा. व्यवसायात विस्तार करण्यासाठी योजना आखाल. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT