Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : जुन्या कल्पनेला आज नवा आकार मिळेल. एखादी छोटी भेट मन हलकं करेल. कामात वेग असेल; पण शब्द जपून वापरा.
वृषभ : घरात एखादा विषय पुन्हा चर्चेत येईल. आर्थिक बाबतीत छोटा पण चांगला निर्णय घ्याल. जुन्या मित्राचा संदेश आश्चर्य देईल.
मिथुन : तुमच्या बोलण्याला वेगळी चमक असेल. नवीन ओळख पुढे उपयोगी पडू शकते. काम अर्धवट सोडू नका; शेवट महत्त्वाचा आहे.
कर्क : मनातल्या गोष्टी लिहून काढाव्याशा वाटतील. कुटुंबातील एखादी व्यक्ती आधार देईल. अचानक खर्च होण्याची शक्यता आहे.
सिंह : लोक तुमच्याकडे उत्तरांसाठी पाहतील. नेतृत्व दाखवण्याची वेळ सहज येईल. रात्री एखादी चांगली बातमी मिळू शकते.
कन्या : साध्या गोष्टीतून मोठं समाधान मिळेल. कामात बारकावे लक्षात येतील आणि फायदा होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष टाळा.
तूळ : मन आणि बुद्धी वेगवेगळं सांगतील. निर्णयासाठी वेळ घ्या. नात्यातील गैरसमज मिटतील. संध्याकाळी सुंदर योगायोग घडेल.
वृश्चिक : गुपित अचानक समोर येईल. अंदाज बरोबर ठरेल. राग दाबण्याऐवजी योग्य शब्द निवडा. रात्री स्वप्नं अर्थपूर्ण वाटतील.
धनु : प्रवासाची किंवा बदलाची चाहूल लागेल. नवीन शिकण्याची इच्छा वाढेल. जुनी चूक उपयोगी धडा ठरेल. रात्र चांगली असेल.
मकर : जवाबदारी वाढेल. आत्मविश्वासही वाढेल. कठोर निर्णय घ्याल. प्रलंबित कामांसाठी उत्तम दिवस. रात्री थकवा वाटेल.
कुंभ : कल्पनाशक्ती जास्त सक्रिय असेल. तंत्रज्ञान किंवा नवीन साधनातून फायदा होईल. मैत्रीत एखादी अनपेक्षित चर्चा होईल.
मीन : मन भावनिक होईल. कलेशी संबंधित गोष्टी आनंद देतील. प्रियजनांची आठवण येईल. शांत झोपेसाठी फोन दूर ठेवा.