Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आज कामात गती येईल व आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य साधारण चांगले राहील.
वृषभ ः आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नवे निर्णय घेताना घाई टाळा. जुने मित्र संपर्कात येऊ शकतात.
मिथुन ः संवाद कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. नोकरी- व्यवसायात नवीन संधी दिसतील. मन अस्थिर राहील. ध्यान उपयुक्त ठरेल.
कर्क ः भावनिक निर्णय टाळा. घरगुती जबाबदार्या वाढू शकतात. आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल. आईकडून किंवा वरिष्ठ स्त्रीकडून साथ मिळेल.
सिंह ः मित्रांकडून मदत मिळेल. नवे विचार व योजना यशस्वी ठरतील. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. मानसिक प्रसन्नता अनुभवता येईल.
कन्या ः कामात बारकावे महत्त्वाचे ठरतील. नवे कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. अनावश्यक चिंता टाळा. पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो.
तूळ ः भागीदारीत लाभ होतील. समतोल विचार केल्यास निर्णय योग्य ठरतील. सर्जनशील कामांना चालना मिळेल. जीवनसाथीशी संवाद वाढवा.
वृश्चिक ः गुप्त शत्रूंपासून सावध रहा. कामाचा ताण वाढू शकतो. धीर व संयम ठेवल्यास परिस्थिती हाताळता येईल. विश्रांती घ्या.
धनु ः वरिष्ठांकडून विश्वास मिळेल. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. नातेवाईक भेटतील. कंबर-सांधेदुखीची काळजी घ्या.
मकर ः प्रवासाचे योग. शिक्षण व अध्यात्माकडे ओढ वाढेल. नवीन योजना सुरू करण्यास अनुकूल दिवस. आर्थिक लाभ होऊ शकतो.
कुंभ ः तुमचे नेतृत्वगुण दिसून येतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
मीन ः कल्पकता व अंतर्ज्ञान मजबूत राहील. कामात सर्जनशीलता दाखवाल. खर्च वाढतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमेल.