Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवीन कामांना सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात चांगली संधी मिळू शकते. अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल.
मिथुन : उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.
कर्क : आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
सिंह : भाग्याची चांगली साथ मिळेल. नवीन कामातून यश मिळण्याचे संकेत आहेत. मित्रांकडून मदत आणि सहकार्य मिळेल.
कन्या : आज कामात नियोजनाला महत्त्व द्या. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. जुन्या मित्रांची भेट आनंद देईल.
तूळ : आज नवीन संधी तुमच्यासमोर येतील. व्यवसायात लाभदायक निर्णय घेता येतील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.
वृश्चिक : आज मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. नोकरीत आनंदाचे वातावरण राहील. प्रगतीचे संकेत दिसतील. कुटुंबात
धनू : आजचा दिवस उत्साहवर्धक ठरेल. शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. प्रवासाचे योग येण्याची शक्यता आहे.
मकर : आज कामाचा ताण जाणवू शकतो. आर्थिक नियोजनावर विशेष लक्ष द्या. घरातील ज्येष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल.
कुंभ : आज महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन योजना आखता येतील.
मीन : आज मन प्रसन्न आणि उत्साही राहील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.