Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज 'या' राशींची अर्धवट स्वप्नं होणार पूर्ण? तुमची रास काय सांगतेय?

Horoscope 18 May 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : जुनं काम नवी दिशा घेईल. छोट्या संवादातून मोठं समाधान मिळेल. पैशाबाबत धाडस करण्यापेक्षा निरीक्षण फायदेशीर ठरेल.

वृषभ

वृषभ

वृषभ : जुनी इच्छा डोकं वर काढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या संयमाची दखल घेतली जाईल. खर्चात सौंदर्य आणि उपयोग यात समतोल साधा.

मिथुन

मिथुन

मिथुन : अचानक भेटलेली व्यक्ती महत्त्वाची ठरू शकते. प्रवास उत्साह देईल. अपूर्ण कल्पना लिहून ठेवा, त्यातून काही मोठं जन्म घेईल.

कर्क

कर्क

कर्क : भावनांच्या लाटेत वाहून न जाता त्यांना दिशा द्या. कुटुंबात एखाद्या विषयावर तुमचं मत निर्णायक ठरेल. थकवा जाणवेल.

सिंह

सिंह

सिंह : लोकांचं लक्ष तुमच्याकडे खेचलं जाईल. अर्धवट स्वप्न पुन्हा हातात घेण्याची वेळ आली आहे. व्यवहारात स्पष्टपणा ठेवा.

कन्या

कन्या

कन्या : लहान तपशील मोठा फायदा करून देतील. कामात गती येईल; पण स्वतःवर जास्त टीका करू नका. जुनी कागदपत्रे उपयोगी पडतील.

तूळ

तूळ

तूळ : मन आणि बुद्धीत समतोल साधण्याचा दिवस. नात्यांमध्ये गोड कबुली वातावरण हलकं करेल. नवीन आर्थिक पर्याय मिळतील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : तुमच्या ॐ शांत स्वभावामागची ताकद लोकांना जाणवेल. गुप्तपणे केलेल्या मेहनतीचं कौतुक होईल. जुन्या आठवणी भावनिक बनवतील.

धनु

धनु

धनु : मन एका ठिकाणी टिकणार नाही. मित्रांसोबतचा संवाद प्रेरणादायी ठरेल. कामात वेगळा मार्ग निवडल्यास यश मिळेल.

मकर

मकर

मकर : स्थिरतेतूनच प्रगतीचा मार्ग दिसेल. वरिष्ठांकडून सल्ला मिळेल. आर्थिक निर्णय घेताना भावनांपेक्षा गणितावर भर द्या.

कुंभ

कुंभ

कुंभ: कल्पनाशक्ती आणि वास्तवाचं मिश्रण घडेल. लोक वेगळ्या दृष्टिकोनामुळे प्रभावित होतील. जुन्या मित्राशी संपर्क होईल.

मीन

मीन

मीन : दडवलेली गोष्ट व्यक्त केल्याने हलकं वाटेल. कला, लेखन किंवा संगीत यातून प्रेरणा मिळेल. खर्च करताना भावनिक निर्णय टाळा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT