Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: मीन राशीला अचानक धनलाभ, मकर राशीची प्रगती! जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य

Horoscope 21 Jun 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्साहाचा आणि ऊर्जेचा राहील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आज मार्गी लागतील. आर्थिक लाभाची दाट शक्यता आहे.

वृषभ

वृषभ

वृषभ : कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. बोलताना शब्दांचा वापर जपून करा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात.

मिथुन

मिथुन

मिथुन : जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. नोकरी किंवा व्यवसायात नवीन आणि चांगल्या संधी मिळतील. मनोरंजनात आणि छंदांमध्ये वेळ घालवाल.

कर्क

कर्क

कर्क : आज तुम्ही थोडे अधिक भावनिक राहाल. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल. ध्यानधारणा केल्याने मनाला शांती मिळेल.

सिंह

सिंह

सिंह : व्यवसायात मोठी प्रगती होण्याची आणि रखडलेले सौदे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. भविष्यातील आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे.

कन्या

कन्या

कन्या : कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे कामाचे योग्य नियोजन करा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखण्याचा प्रयत्न करा.

तूळ

तूळ

तूळ : जोडीदारासोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ आणि प्रेमळ होतील. एखादा जवळचा किंवा दूरचा प्रवास अचानक घडून येऊ शकतो, जो तुमच्यासाठी आनंददायी ठरेल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेरचे खाणे टाळा. कामाच्या ठिकाणी किंवा घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळणे हिताचे राहील.

धनु

धनु

धनु : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नवीन गोष्टी शिकायला मिळतील, यश मिळेल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी समजू शकते.

मकर

मकर

मकर : कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे फळ आज तुम्हाला मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन वाटा खुल्या होतील.

कुंभ

कुंभ

कुंभ : कला आणि रचनात्मक कामात तुमचे मन रमेल. सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमचा सन्मान आणि लोकप्रियता वाढेल.

मीन

मीन

मीन : तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. नवीन वाहन किंवा घरातील उपयोगी वस्तू खरेदीचे योग जुळून येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT