Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : ऊर्जा चांगली असेल; पण घाईघाईत निर्णय टाळा. कामात प्रगती होईल. कुटुंबीयांशी संवाद साधल्याने मन हलके होईल.
वृषभ : आर्थिक बाबतीत सावध राहा. अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी स्थिरता राहील. नवीन संधींची वाट पाहावी लागेल.
मिथुन : आत्मविश्वास वाढलेला असेल. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
कर्क : भावनिकदृष्ट्या थोडा ताण जाणवू शकतो. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलणे हिताचे. आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक लाभ संभवतो.
सिंह : तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. आरोग्य सांभाळा.
कन्या: कामाचा ताण वाढू शकतो; पण नियोजनाने तो हाताळता येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
तूळ : : नवीन संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्जनशीलता दिसून येईल. निर्णय घेताना संतुलन राखा. मुलांच्या यशाने आनंद होईल.
वृश्चिक : गुप्त चिंता त्रास देऊ शकतात. शांत राहून परिस्थितीचा विचार करा. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल. निर्णय घेताना संयम ठेवा.
धनु : प्रवासाची शक्यता आहे. नवीन अनुभव मिळतील. करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो. नातेवाईकांची भेट होईल.
मकर : जबाबदाऱ्या वाढतील; पण तुम्ही समर्थपणे पार पाडाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
कुंभ : नवीन कल्पना सुचतील. कामात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करा. मित्रांशी मतभेद टाळा. कामात बढतीची संधी मिळेल.
मीन : आज मन शांत राहील. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. आर्थिक बाबतीत समाधानकारक स्थिती राहील.