Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : तुम्हाला नफा होईल. कंटाळवाण्या आणि धिम्या अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील.
वृषभ : आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. कुटुंबीयांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. लोक प्रश्न घेऊन आले तर दुर्लक्ष करा.
मिथुन : धन लाभनक्कीच होईल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे.
कर्क : पालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची, काळजी घेण्याची गरज भासेल. प्रेम आशेचा किरण दाखवेल. आजचा दिवस सुरळीत जाईल.
सिंह : व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक ठरेल. जीवनाच्या धावपळीत मुलांसाठी वेळ काढाल.
कन्या : तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका.
तूळ : तुम्हाला शांततेचा अनुभव होईल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.
वृश्चिक : इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडी-निवडी, गरजांचा विचार करा.
धनु : कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपला दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल.
मकर : नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी.
कुंभ : भवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करेल.
मीन : अति उत्साह आणि महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा.