Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: या राशीच्या व्यक्तींचा आज खर्च वाढण्याची शक्यता; पाहा १२ राशींचे अचूक भविष्य

Horoscope 2 September 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : आज कामात उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत घाईचे निर्णय टाळा.

वृषभ

वृषभ

वृषभ : नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. खर्च वाढण्याची शक्यता. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन

मिथुन

मिथुन : निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता. प्रवासात काही अडथळे येऊ शकतात.

कर्क

कर्क

कर्क : कामाचा ताण वाढेल. प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळतील. घरातील वातावरण आनंदी राहील. गुंतवणूकीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सिंह

सिंह

सिंह : आत्मविश्वासाच्या जोरावर नवीन काम हाती घेऊ शकता. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता. व्यवसायात लाभाची संधी मिळेल.

कन्या

कन्या

कन्या : नियोजनबद्ध काम केल्यास चांगले यश मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

तूळ

तूळ

तूळ : नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. मेहनतीचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

धनु

धनु

धनू : नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. कामानिमित्त प्रवासाची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत दिवस मध्यम स्वरूपाचा राहील.

मकर

मकर

मकर : कामातील अडथळे दूर होण्यास सुरुवात होईल. वरिष्ठांचा विश्वास संपादन करता येईल. पैशांची आवक वाढण्याची शक्यता आहे.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवसायात विस्ताराच्या संधी निर्माण होऊ शकतात. मित्रांकडून महत्त्वाची मदत मिळेल.

मीन

मीन

मीन : भावनिक निर्णय घेण्याऐवजी परिस्थितीचा शांतपणे विचार करा. कामात नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT