Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 2 March 2026: आजचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार खास; कोणावर होणार धनवर्षाव?

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : नवे काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या निर्णयक्षमतेची दखल घेतली जाईल. कुटुंबासोबत वेळ घालवा.

वृषभ

वृषभ

वृषभ : कामाचा ताण जाणवेल; पण संयम ठेवा. जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळेल. अनपेक्षित खर्च संभवतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन

मिथुन

मिथुन : अडलेली कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. प्रवासाची शक्यता आहे. मनात सकारात्मक विचार ठेवा.

कर्क

कर्क

कर्क : घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. कार्यक्षेत्रात स्थैर्य मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. भावनिक निर्णय टाळा.

सिंह

सिंह

सिंह : नेतृत्वगुणांना वाव मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. मित्रांसोबत मतभेद टाळा. संध्याकाळी आनंददायी बातमी मिळू शकते.

कन्या

कन्या

कन्या : नियोजनबद्ध काम केल्यास यश निश्चित. व्यायाम सुरू करा. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

तूळ

तूळ

तूळ : भागीदारीतून लाभ संभवतो. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. सर्जनशील कामात प्रगती होईल. मनःशांतीसाठी ध्यान उपयुक्त ठरेल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : गुप्त शत्रू पासून सावध राहा. कार्यक्षेत्रात बदलाची चिन्हे दिसतील. धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. जोडीदाराशी संवाद वाढवा.

धनु

धनु

धनु : नवीन संधी दार ठोठावतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. प्रवासातून लाभ संभवतो. आर्थिक नियोजन करा.

मकर

मकर

मकर : कामात यश मिळेल. घरातील वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या. अनावश्यक वाद टाळा. आरोग्य सामान्य राहील.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची वेळ आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल.

मीन

मीन

मीन : भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रगती होईल. जुनी देणी वसूल होतील. कुटुंबातील वातावरण उत्साही राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT