Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : उत्साह जास्त असेल. दिशाहीन धावपळ टाळावी. अपूर्ण काम पूर्ण करण्यावर भर द्या. संध्याकाळ शांत घालवली तर मन स्थिर होईल.
वृषभ : आराम आणि स्थिरता महत्त्वाची वाटेल. अनावश्यक वाद टाळा. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधल्यास दिवस समाधानकारक जाईल.
मिथुन : संवादातून मार्ग निघतील. योग्य शब्दांची निवड फायदेशीर ठरेल. अफवांपासून दूर राहणे हिताचे. जोडीदाराची साथ लाभेल.
कर्क : भावनिक चढ-उतार संभवतात. भूतकाळात अडकून न पडता वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक. दिवस संमिश्र असेल.
सिंह : लोकांचे लक्ष वेधले जाईल. अहंकार टाळून संयम ठेवला तर लाभमिळेल. कामात पुढाकार घ्यावा. नेतृत्व स्वीकारले जाईल.
कन्या: परफेक्शनच्या मागे धावताना ताण वाढ शकतो. थोडी सैल भूमिका घेतल्यास कामे सहज पूर्ण होतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.
तूळ : निर्णय घेण्याची वेळ आली आहे. विलंब केल्यास गोंधळ वाढेल. स्पष्ट भूमिका फायदेशीर ठरेल. वरिष्ठ सहकारी मार्गदर्शन करतील.
वृश्चिक : गुप्तता राखण्याची प्रवृत्ती वाढेल. मात्र योग्य व्यक्तींशी संवाद साधल्यास मानसिक हलकेपणा मिळेल. कौटुंबिक सख्य राहील.
धनु : नवीन अनुभवांची ओढ राहील. रोजच्या सवयींमध्ये छोटा बदल सकारात्मक परिणाम देईल. आर्थिक लाभ होईल.
मकर : कामावर लक्ष केंद्रित राहील, विश्रांती न घेतल्यास थकवा जाणवू शकतो. संतुलन राखणे गरजेचे. आर्थिक बाबतीत सावध राहा.
कुंभ: नवीन कल कल्पना यशस्वी ठरू शकतात. मित्रांकडून सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मीन : मन शांत ठेवण्याची गरज. अनावश्यक विचारांपासून दूर राहिल्यास दिवस अधिक समाधानकारक जाईल.