Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. रखडलेली आर्थिक कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.
वृषभ : आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आजच्या सणाची तयारी करताना खर्च वाढू शकतो; पण तो आनंदाचा असेल. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील.
मिथुन : नवीन व्यवसाय किंवा भागीदारी सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरीत बढतीचे योग आहेत.
कर्क : विनाकारण कोणाशीही वादात पडू नका. ध्यान आणि योगा केल्यास मनाला शांती मिळेल. आर्थिक बाजू सामान्य राहील.
सिंह : सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत. नवीन कपडे किंवा दागिन्यांची खरेदी होण्याची शक्यता आहे.
कन्या : कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवू शकतो; पण कामाचे समाधान मिळेल. धार्मिक कार्यासाठी वेळ काढाल. जोडीदाराकडून एखादी सरप्राईज भेट मिळू शकते.
तूळ : प्रवासाचे योग आहेत, जे तुमच्यासाठी सुखद ठरतील. नवीन ओळखी होतील ज्यांचा भविष्यात फायदा होईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल.
वृश्चिक : आज बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल, अन्यथा जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
धनु : नशिबाची साथ लाभल्याने आज प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगतीचा काळ आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा.
मकर : मेहनत जास्त करावी लागेल; पण त्याचे फळही गोड मिळेल. नवीन मालमत्ता किंवा वाहन घेण्याचे विचारचक्र सुरू होईल. घरातील वरिष्ठांचे आरोग्य सुधारेल.
कुंभ: आज तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल. अचानक एखादी शुभवार्ता कानावर येईल.
मीन : मानसिक शांतता लाभेल. प्रदीर्घ काळापासून असलेले टेन्शन आज दूर होऊ शकते. जवळच्या नातेवाईकांशी असलेले संबंध सुधारतील. आर्थिक बचतीकडे लक्ष द्याल.