मेष : प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर फायदा होईल. तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. मनोबल उंचावेल.
वृषभ : आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा.
मिथुन : मूळ स्वभावात वागणुकीत बदल करू नका. प्रवासाच्या संधी शोधाल. सुखी वैवाहिक जीवनाचे महत्त्व कळेल.
कर्क : अंतिमतः खासगी आयुष्य हाच प्रमुख लक्ष द्यायचा विषय असेल, पण आज सामाजिक, कामावर लक्ष केंद्रित कराल.
सिंह : आर्थिकदृष्ट्या आज दिवस मिळताजुळता राहील. आज तुम्हाला धनलाभही होऊ शकतो; परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल.
कन्या : द्विधा अवस्था नाहीशी होईल. प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा.
तूळ : घरातील सदस्य तुमच्यावर रागावू शकतो. त्यांच्या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करा. मनावर ताबा ठेवा.
वृश्चिक : भविष्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मोकळ्या वेळेचा वापर करून कुटुंबातील सदस्यांना मदत करा.
धनु : आज तुम्ही मन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
मकर : गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. मित्र आणि अनोळखीतील फरक ओळखण्याची सावधानता बाळगा.
कुंभ : घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची गरज आहे. सकारात्मक विचार करावा लागेल.
मीन : आज घरात तुम्ही कुणालाही दखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. तुमचे धैर्य पाहन तुम्ही प्रेम जिंकाल.