Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आजचे राशिभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळाल्याने कामे सुलभ होतील

Horoscope 18 November 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. कामातील रखडलेली कामे मार्गी लागतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल.

वृषभ

वृषभ

वृषभ : नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : भाग्याची साथ मिळाल्याने कामे सुलभ होतील. नवीन गोष्टी शिकाल. धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभाग घ्याल.

कर्क

कर्क

कर्क : आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. कुटुंबातील प्रश्न सामंजस्याने सोडवा. अचानक काही खर्च होईल.

सिंह

सिंह

सिंह : भागीदारीत चांगले यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील.

कन्या

कन्या

कन्या : कामाच्या ठिकाणी स्पर्धेला सामोरे जावे लागेल. नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ

तूळ

तूळ : सर्जनशील विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती साधता येईल. प्रेमसंबंधात आनंददायी वातावरण राहील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. घरातील वातावरण आनंदी राहिल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा.

धनु

धनु

धनू : नवीन योजना आखण्यासाठी दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च आणि वाद टाळावेत.

मकर

मकर

मकर : आर्थिक नियोजनातून फायदा होईल. बोलण्यातील संयम नातेसंबंध सुधारेल. कुटुंबासाठी वेळ देण्याची संधी मिळेल.

कुंभ

कुंभ

कुंभ : आत्मविश्वास वाढलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. जोडीदार आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

मीन

मीन

मीन : कामात अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT