Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: ग्रहांची बदलती चाल; आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? सर्व १२ राशींचे भविष्य

Horoscope 18 May 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास इतरांना प्रभावित करेल. अचानक प्रवास किंवा भेटीचा योग संभवतो.

वृषभ

वृषभ

वृषभ : आर्थिक बाबतीत सावध पावले टाका. मनात साचलेली चिंता एखाद्यासमोर बोला. आवडत्या गोष्टीत वेळ घालवाल.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन लोकांशी ओळख भविष्यात उपयोगी पडू शकते. चांगली बातमी मिळेल. तुमचे बोलणे अनेकांना आकर्षित करेल.

कर्क

कर्क

कर्क : भावनिक निर्णय घेण्याऐवजी शांतपणे विचार करा. जुन्या आठवणींनी हळवे व्हाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह

सिंह

सिंह : नेतृत्वगुणांना दाद मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळेल. अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे नियोजन करा.

कन्या

कन्या

कन्या : छोट्या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा मोठे चित्र पाहा. शिस्त आणि संयम तुमच्या बाजूने निकाल देतील. जुन्या मित्रांशी भेट होईल.

तूळ

तूळ

तूळ : नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वेळ आहे. भागीदारीत स्पष्टता ठेवा. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : गुप्तपणे केलेले प्रयत्न यशाकडे नेतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. नातेसंबंध टिकतील.

धनु

धनु

धनु : प्रवासाचे किंवा नव्या योजनेचे संकेत मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी दिवस प्रेरणादायी राहील. अपूर्ण कामांकडे लक्ष द्या.

मकर

मकर

मकर : संयम हाच सर्वांत मोठा गुण ठरेल. आर्थिक निर्णयांमध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात.

कुंभ

कुंभ

कुंभ : नव तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळेल. वेगळा विचार मांडल्यामुळे कौतुक होईल. मित्रांच्या मदतीने अडकलेले काम पूर्ण होईल.

मीन

मीन

मीन : सर्जनशीलता खुलून येईल. कलेशी संबंधित लोकांना चांगली संधी मिळू शकते. जुन्या व्यक्तीकडून अनपेक्षित संपर्क होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT