मेष : उत्साह वाढविण्यासाठी वैभवशाली चित्र मनात ठसवा. आई-वडिलांच्या आरोग्यावर अधिक धन खर्च करावे लागू शकते.
वृषभ : मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल. त्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल.
मिथुन : वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल.
कर्क : तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. भागीदारीतली व्यवसायाची संधी चांगली वाटेल. पण सर्व बाबींची स्पष्टता असणे गरजेचे.
सिंह : दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. सकारात्मक वाटचाल करा.
कन्या : लोक सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल.
तूळ : मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका.
वृश्चिक : अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. एखादा नातेवाईक सरप्राईज देईल. पण त्यामुळे योजना बारगळेल.
धनु : शेरेबाजीवर खूप संवेदनशील बनाल. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा.
मकर : मित्र-मैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार कराल.
कुंभ : तुमचा मानसिक तणाव वाढेल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. वयोवृद्धाची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. काळजी घ्यावी लागेल.
मीन : प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे. त्याचा सुखद अनुभव घ्या. धाडसी पावले उचलल्याने फायदा होईल.