Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या लोकांना आज आनंदाची बातमी मिळणार; कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Horoscope 17 October 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : घाईपेक्षा शांत डोक्याने घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. कामात नवी कल्पना तुमची छाप पाडेल. आनंदाची बातमी मिळू शकते.

वृषभ

वृषभ

वृषभ : छोटासा बदल तुमचा दिवस सुंदर करेल. पैशांबाबतीत गरज आणि हौस यात फरक ओळखा. कामातील सातत्य नवी संधी आणेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : तुमचे शब्द एखाद्याचा दृष्टिकोन बदलतील. नवीन ओळखीतून रंजक विचारांची देवाणघेवाण होईल. अर्धवट कामे पूर्ण होतील.

कर्क

कर्क

कर्क : स्वतःच्या आनंदासाठी वेळ द्या. छोटा संवाद मोठा गैरसमज दूर करू शकतो. कामात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या.

सिंह

सिंह

सिंह : नेतृत्व करताना इतरांचे मत ऐकून घ्या. तुमची वेगळी शैली लक्ष वेधून घेईल. खर्च करण्याआधी उद्याच्या गरजांचाही विचार करा.

कन्या

कन्या

कन्याः परिपूर्णतेपेक्षा प्रगतीला महत्त्व द्याल. लहान तपशिलातून महत्त्वाची गोष्ट समजेल. नियोजनात मोकळीक ठेवल्यास ताण कमी होईल.

तूळ

तूळ

तूळ : समतोल राखण्यापेक्षा योग्य बाजू निवडा. सर्जनशील विचार कामात नवा रंग भरतील. नात्यात स्पष्ट बोलल्याने जवळीक वाढेल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिकः निरीक्षणातून महत्त्वाचा धागा सापडेल. रखडलेले काम नव्या पद्धतीने पुढे नेता येईल. संशयाऐवजी पुराव्यावर विश्वास ठेवा.

धनु

धनु

धनू : चौकटीबाहेर विचार करण्याची संधी मिळेल. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा प्रत्यक्षात आणा. चर्चेतून दिशा मिळू शकते.

मकर

मकर

मकर : यशाचा वेग कमी असला तरी दिशा योग्य ठेवा. जुनी जबाबदारी नव्या पद्धतीने हाताळता येईल. कामासोबत विश्रांतीला वेळ द्या.

कुंभ

कुंभ

कुंभ : वेगळा विचार तुमची ताकद ठरेल. मित्राकडून सूचना मिळेल. नवीन प्रयोग करा. स्वतःच्या कल्पनेला कृतीची जोड द्या.

मीन

मीन

मीन : अंतर्मनाचा आवाज ऐका; पण वास्तवही तपासा. कलेतून ऊर्जा मिळेल. इतरांची काळजी घेताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT