Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 17 April 2026: आजचा दिवस ठरेल तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट? तुमची रास काय सांगते?

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : उत्साहाने दिवसाची सुरुवात होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ

वृषभ

वृषभ : आर्थिक दृष्टीने आजचा दिवस मध्यम असेल. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मिथुन

मिथुन

मिथुन : आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मित्र-मैत्रिणींसोबत आनंदाचे क्षण घालवाल.

कर्क

कर्क

कर्क : नोकरीत पदोन्नती किंवा बदलीचे संकेत आहेत. घरातील मोठ्यांचा सल्ला मोलाचा ठरेल. मानसिक शांततेसाठी योगा किंवा ध्यानाचा आधार घ्या.

सिंह

सिंह

सिंह : प्रवासाचे योग येतील, जो सुखद राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मात्र, गुप्त शत्रूपासून सावध राहणे आवश्यक आहे.

कन्या

कन्या

कन्या: आज अचानक धनलाभाचे योग आहेत. तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे कठीण कामे सोपी होतील. प्रेमसंबंधात गोडवा येईल.

तूळ

तूळ

तूळ : जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम दिवस आहे. व्यवसायात नवीन भागीदारी फायदेशीर ठरू शकते. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे नियोजन महत्त्वाचे आहे. स्पर्धकांवर विजय मिळवाल. कर्जाशी संबंधित व्यवहार आज टाळलेले बरे.

धनु

धनु

धनु : सर्जनशील कामात यश मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद होईल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे.

मकर

मकर

मकर : मालमत्तेशी संबंधित वादातून सुटका होईल. घरात आनंदाचे वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे कौतुक मिळेल.

कुंभ

कुंभ

कुंभ : तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. भावंडांशी असलेले संबंध सुधारेल. कामाच्या निमित्ताने केलेले प्रवास यशस्वी होतील.

मीन

मीन

मीन : आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT