Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : दिवसभरात खूप काही यश मिळवाल. काही सहकाऱ्यांकडे लक्ष द्या, कारण त्यांना हवे ते मिळाले नाही तर ते काम करीत नाहीत.
वृषभ : अनुभवी लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. कुटुंबीयांच्या भावना दुखावू नका.
मिथुन : भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होईल.
कर्क : कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे, ही तुमची प्राथमिकता असेल. कामाचा ताण येईल. प्रिय व्यक्ती आनंद देईल.
सिंह : धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायी ठरतील. घरातून बाहेर जाऊन मोकळ्या हवेत फिरा.
कन्या : स्वतःला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते.
तूळ : निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही प्रगती करू शकणार नाही. चिंतेमुळे तुमची विचारशक्ती मंदावेल. उजळ बाजूकडे पाहा. सकारात्मक राहा.
वृश्चिक : तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आज मिळेल.
धनु : आर्थिक नुकसान होऊ शकते. मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करा. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते हे लक्षात येईल.
मकर : आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील. वातावरण आशादायी आहे.
कुंभ : प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका, प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत.
मीन : वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. आर्थिक लाभहोतील. घरचे प्रश्न सोडविण्यासाठी बुद्धिमत्ता वापरा.