मेष : प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला दिवस.
वृषभ : अधिक विश्रांती घ्यावी लागेल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. मनोबल उंचावेल.
मिथुन : भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल.
कर्क : आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल.
सिंह : एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. आज तुम्ही सहजपणे समस्यांवर मात कराल आणि विजेते ठराल. आनंदाने भारावून जाल.
कन्या : आंतरिक क्षमता निश्चित साथ देईल. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे शिकावे लागेल अथवा जीवनात मागे राहाल.
तूळ : जर तुम्हाला कार्यक्षेत्रात उत्तम करण्याची इच्छा आहे, तर आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक : आज हुरूप येईल. पगारातील वाढ उल्हसित करेल. उदासी आणि तक्रारी दूर सारण्याची हीच खरी वेळ आहे.
धनु : विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.
मकर : आता तुमच्या महत्त्वाकांक्षा ओळखण्याची वेळ आहे आणि त्यानुसार मेहनत करायला हवी. सकारात्मक विचार करा.
कुंभ : सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करण्यापासून दूर राहा. दिवसाचा चांगला उपयोग करा.
मीन : प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी मनाला उद्युक्त करा.