Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : जुन्या प्रयत्नाला अपेक्षित गती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल.
वृषभ : आर्थिक नियोजनासाठी दिवस अनुकूल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. जवळच्या व्यक्तीशी गैरसमज दूर होतील.
मिथुन : रखडलेली चर्चा सकारात्मक वळण घेईल. नवीन कल्पनांचे कौतुक होईल. घरात वातावरण प्रसन्न राहील. अनावश्यक खर्च टाळा.
कर्क : निर्णयात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कार्यक्षेत्रात संयम ठेवल्यास लाभ मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
सिंह : तुमच्या नेतृत्वगुणांना संधी मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यास योग्य दिवस. कुटुंबात आनंदवार्ता मिळू शकते.
कन्या : जुन्या संपर्कातून नवे काम मिळेल. विद्यार्थ्यांची प्रगती दिसेल. महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता काळजीपूर्वक करा.
तूळ : दिवसभरात अनपेक्षित संधी समोर येतील. व्यवसायात थोडासा लाभ होईल. जोडीदाराशी संवाद अधिक खुला ठेवा.
वृश्चिक : कठीण कामही आत्मविश्वासामुळे सहज पूर्ण कराल. वरिष्ठांची मर्जी राहील. ज्येष्ठांचा सल्ला लाभदायी ठरेल.
धनू : नवीन योजना आखण्यासाठी दिवस अनुकूल. सामाजिक कार्यक्रमात सहभाग वाढेल. आर्थिक बाबतीत संयम ठेवा.
मकर : कामातील सातत्यामुळे यश मिळेल. कौटुंबिक निर्णय सर्वांच्या सहमतीने घ्या. जुनी थकबाकी वसूल होईल. आराम करा.
कुंभ : नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. कार्यक्षेत्रात तुमच्या नियोजनाचे कौतुक होईल. महत्त्वाच्या वस्तू जपून ठेवा.
मीन : व्यवसायात नवीन ग्राहक किंवा संधी मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. वरिष्ठांची मर्जी राखाल.