Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष ः आज कामाच्या ठिकाणी जबाबदार्या वाढू शकतात; पण तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास तुम्हाला यश देईल. आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका.
वृषभ ः आर्थिक नियोजनासाठी चांगला दिवस. गुंतवणुकीसंबंधी विचारपूर्वक निर्णय घ्या. नातेसंबंधात गोडवा वाढेल. जुने वाद मिटवण्याची संधी मिळू शकते.
मिथुन ः नवीन ओळखी आणि संपर्क भविष्यासाठी लाभदायक ठरतील. कामात सर्जनशीलता दाखवण्याची संधी मिळेल. प्रवासाचा योग संभवतो.
कर्क ः भावनिक स्थैर्य महत्त्वाचे ठरेल. कुटुंबीयांच्या गरजांकडे लक्ष द्या. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा, विशेषतः पचनसंस्थेची काळजी घ्या.
सिंह ः नेतृत्वगुणांमुळे कार्यक्षेत्रात कौतुक होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी संभवतात. आत्मविश्वास टिकवा; पण अहंकार टाळा.
कन्या ः कामात बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. कागदपत्रे आणि करार तपासूनच पुढे जा. आरोग्य सुधारण्यासाठी दिनचर्येत बदल करा.
तूळ ः भागीदारीत यश मिळण्याची शक्यता. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. मन:शांतीसाठी स्वतःसाठी वेळ काढा.
वृश्चिक ः गुप्त योजना किंवा दीर्घकालीन नियोजनाला चालना मिळेल. वैवाहिक जीवनात संवाद महत्त्वाचा ठरेल. संयम राखल्यास दिवस फलदायी ठरेल.
धनु ः शिक्षण, परदेश संपर्क किंवा प्रवास याबाबत चांगली बातमी मिळू शकते. नवीन संधी स्वीकारण्यास घाबरू नका. आरोग्य चांगले राहील.
मकर ः करिअरमध्ये प्रगतीचे संकेत. वरिष्ठांशी मतभेद टाळा. कुटुंबातील जबाबदार्या वाढतील. आर्थिक बाबतीत स्थिरता राखण्यासाठी शिस्त पाळा.
कुंभ ः नवीन कल्पनांना वाव मिळेल. सहकार्यांसोबत टीमवर्क फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधात स्पष्टता आवश्यक. मानसिक शांततेसाठी ध्यानाचा उपयोग होईल.
मीन ः सर्जनशील कार्यात यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील.