Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ : व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
मिथुन : आज तुमच्या कल्पकतेला चांगला वाव मिळेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी संयम राखा.
कर्क : आज मन प्रसन्न आणि उत्साही राहील. कामात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते.
सिंहः आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सकारात्मक बातमी मिळेल.
कन्या : नियोजनबद्ध काम केल्यास फायदा होईल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
तूळ : आज सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. नवीन कामातून लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.
वृश्चिक : मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. जुन्या आर्थिक प्रश्नांवर तोडगा निघेल. शब्द जपून वापरा.
धनू : भाग्याची चांगली साथ मिळेल. प्रवासाचे योग. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. महत्त्वाच्या कामात घाई करू नका.
मकर : कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. आनंदाची बातमी मिळेल.
कुंभ : नवीन संधी येतील. मित्रांची मदत य मिळेल. गुंतवणुकीचे निर्णय काळजीपूर्वक घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मीन : मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आर्थिक लाभाची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तींचा सहवास आनंद देईल.