Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 14 March 2026: या राशीच्या व्यक्तींना धाडसी निर्णयांचा फायदा होईल पण 'ही' एक गोष्ट लक्षात ठेवा; पाहा राशिभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : आज कामात नवीन संधी मिळू शकतात. उत्साहाने काम केल्यास प्रगती होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे ऐका.

वृषभ

वृषभ

वृषभ : आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे. नवीन योजना सुरू करण्याची शक्यता. जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : कामाचा ताण वाढू शकतो. संवाद करताना संयम ठेवा. कौटुंबिक सौख्य राहल. प्रवास किंवा नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.

कर्क

कर्क

कर्क : नोकरी व्यवसायात प्रगतीची शक्यता. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रस वाढेल.

सिंह

सिंह

सिंह : खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. नातेवाईकांची भेट होईल.

कन्या

कन्या

कन्या : कामात नवीन संधी मिळतील. अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता. घर - कुटुंबात समाधान मिळेल.

तूळ

तूळ

तूळ : सामाजिक क्षेत्रात मान प्रतिष्ठा वाढेल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. कामात प्रगतीची शक्यता. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारू शकते. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. मुलांच्या प्रगतीने आनंद वाटेल.

धनु

धनु

धनु : प्रवास किंवा नवीन कामाचे संकेत. धैर्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. मन प्रसन्न राहील.

मकर

मकर

मकर : कामात अडथळे येऊ शकतात. धीर आणि संयम ठेवणे आवश्यक. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा.

कुंभ

कुंभ

कुंभ: नवीन कल्पना यश देऊ शकतात. मित्रांशी संबंध मजबूत होतील. छोटा आर्थिक लाभसंभवतो.

मीन

मीन

मीन : मान, प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसतील. कुटुंबासोबत आनंदाचा दिवस जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT