Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : प्रत्येकाच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी प्रयत्न कराल. अनेक दिशांमध्ये ओढाताण होईल. प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे.
वृषभ : अति खाणे टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. बँकेसंदर्भात व्यवहार काळजीपूर्वक हाताळा.
मिथुन : काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल; पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता, अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या.
कर्क : कमकुवत जीवनेच्छा तीव्र विषासारखी शरीरावर विपरीत परिणाम करील. म्हणून कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वतःला गुंतवून घ्या.
सिंह : उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खासकरून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल.
कन्या : तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. कामानिमित्त खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
तूळ : एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्याजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल.
वृश्चिक : तुम्ही पैसे कमावण्यात यशस्वी व्हाल. घरातील सणांचे उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल.
धनु : पैशाची बचत केली पाहिजे. पाहुण्यांचा सहवास, आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काही तरी खास योजना आखा.
मकर : दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार. म्हणून इतर दुसऱ्या कामामध्ये स्वतःला गुंतविणे श्रेयस्कर.
कुंभ : आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील.
मीन : अनपेक्षित बक्षीसही मिळेल. आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभव्हावा, असे वाटत असेल, तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका.