मेष : दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल, तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे.
वृषभ : करिअरसंदर्भात महत्त्वाचा बदल करण्याचा काही काळापासूनचा आपला विचार अंमलात आणावयास हरकत नाही.
मिथुन : काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे कुटुंबातील लोकांना ही आनंद मिळेल.
कर्क : खूप संवेदनशील बनाल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील, असे कृत्य करणे टाळा.
सिंह : कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा. विनाकारण कोणत्याही वादात अडकू नका.
कन्या : चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल.
तूळ : काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. या राशीतील व्यावसायिक आज जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात.
वृश्चिक : आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.
धनु : कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खूश करण्यासाठी आज प्रयत्न करेल.
मकर : नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित निकाल मिळाला नाही, तरी नाराज होऊ नका.
कुंभ : वेळेला पैशाइतपतच असणारे महत्त्व तुम्ही जाणत असाल, तर तुमच्या क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. मनावर ताबा ठेवा.
मीन : व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो.