मेष : मित्रांचा आधार लाभेल आणि ते आनंदी ठेवतील. आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकले, तर अतिरिक्त रोकड कमावू शकाल.
वृषभ : दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. कुणीतरी शुभेच्छा देईल.
मिथुन : जीवनाचा आनंद लोकांसोबत चालण्यातच आहे, ही गोष्ट स्पष्टतेने समजू शकतात. विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल.
कर्क : गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता; पण आज या सर्व तक्रारी दूर होतील.
सिंह : जीवनात सर्व गोष्टी तेव्हाच चांगल्या राहतात, जेव्हा तुमचा व्यवहार सरळ राहतो. व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता. नियोजनला महत्त्व द्या.
कन्या : रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, जे काम मागील दिवसात करू शकला नव्हता.
तूळ : अतिखर्च आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. व्यस्ततेतून थोडा वेळ काढा आणि मित्रमंडळींसमवेत बाहेर जा.
वृश्चिक : आजच्या दिवसाची संध्याकाळ जोडीदारासमवते व्यतित कराल. भविष्याची योजना बनवण्यासाठी उपयुक्त दिवस.
धनु : वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात आणि त्यांचा अनुभव येईल. वडील काही भेट आणू शकतात.
मकर : तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. काही जण प्रवासासाठी रवाना व्हाल.
कुंभ : सामाजिक कामात रमाल. परंतु, अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. मन आनंदी राहील.
मीन : प्रदीर्घ काळापासून सुरू असलेले भांडण सोडवा. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका.