Horoscope
चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
श्रीगणेश म्हणतात की, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आज तुम्हाला मोठे यश मिळवून देईल. अनुकूल काळाचा योग्य उपयोग करा. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. भविष्यातील काही महत्त्वाच्या योजनांचे नियोजन कराल. मालमत्ता किंवा वारसाहक्काशी संबंधित काही कामांमध्ये अडथळा येऊ शकतो, त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भावंडांशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांच्या समस्यांमध्ये तुमचा पाठिंबा उपयोगी ठरू शकतो. तुमची कार्यशैली आणि योजना तुमच्या व्यवसायाला चालना देऊ शकते.
श्रीगणेश सांगतात की, आज सामाजिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. संर्पकक्षेत्रातील वाढ होईल. तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकते. नवीन वाहन खरेदी संदर्भात योजना बनेल. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक प्रश्नांवर तोडगा निघेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करावे. करमणुकीत वेळ वाया घालवू नका, यामुळे तुमचे महत्त्वाचे काम थांबू शकते. व्यवसायात तुमचा निर्णय महत्त्वाचा ठरेल.
श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस रोजच्या आयुष्यापेक्षा वेगळा जाईल. तुम्ही काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल. मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होईल. तुमच्यात नवीन ऊर्जा जाणवू शकते. कोणावर विश्वास ठेवण्याआधी त्याच्याबद्दल सर्व बाजूंनी विचार करा. मित्रांसोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. भागीदारीसंबंधी व्यवसायात पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. पती-पत्नीमध्ये योग्य समन्वय राहील. आरोग्य चांगले राहिल.
श्रीगणेश सांगतात की, आज काही महत्त्वाच्या व्यक्तींबरोबर चर्चा होईल. यामाध्यमातून नवीन यश मिळवण्याचा मार्ग तयार होईल. शत्रूही तुमच्या व्यक्तिमत्त्वासमोर हतबल होतील. कोणतेही महत्त्वाचे काम करण्याआधी त्यासंदर्भात पुन्हा विचार करा. एखादी छोटी चूक तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. घरात शिस्त राखणे आवश्यक आहे. व्यवसायात तुम्ही बनवलेल्या बदलांच्या योजना लवकर अंमलात आणा, असा सल्ला श्रीगणेश देता. पती-पत्नीमधील मतभेद संपुष्टात येतील.
श्रीगणेश म्हणतात की, आज घरातील नुतनीकरणासंबंधी कामावर लक्ष केंद्रीत कराल. यावेळी वास्तुशास्त्राचे नियम पाळणे योग्य ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी बजेट राखणे गरजेचे आहे. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. मालमत्तेसंबंधी जवळच्या नातेवाईकांशी वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अधिक व्यस्त राहाल.
श्रीगणेश सांगतात की, मागील काही दिवस प्रलंबित असणारे काम मार्गी लागल्याने मानसिक तणावातून आराम मिळेल. नातेवाईकांमध्ये वादग्रस्त प्रकरणात तुमची उपस्थिती राहील. कोणतेही कार्य करताना खूप काळजी घ्या किरकोळ चुकीमुळे मोठे नुकसान होवू शकते. तुमच्या योजना कोणाला सांगू नका; कुणीतरी त्याचा गैरफायदा घेतला जावू शकतो. व्यवसायात कोणतीही क्रिया दुर्लक्षित करू नका. घरातील वातावरण आनंदी राहील. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा पोटविकाराचा त्रास होईल.
आज कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुमच्या विचारांना प्राधान्य द्या, असा सल्ला श्रीगणेश देतात. तुमच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या जवळच्या नातेवाईकाशी संबंध बिघडू शकतात, त्यामुळे अधिक सावध राहा. घरातील वडिलधाऱ्यांचा सल्ला दुर्लक्षित करू नका. त्यांचा आशीर्वाद आणि सहकार्यामुळे सर्व काही सुरळीत होईल. यंत्रसामग्री आणि लोखंडाशी संबंधित व्यवसायात यश मिळू शकते. पती-पत्नीमध्ये योग्य समन्वय राहील.
धार्मिक संस्थांमध्ये सेवा संबंधित कार्यांमध्ये रुची घेतल्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. समाजात तुमचा सन्मान टिकून राहील. सध्या तुमचे लक्ष फक्त तुमच्या ध्येयावर केंद्रित ठेवा, यश मिळू शकते. तुम्ही वाहन खरेदीचा विचार करत असाल, तर तो सध्या टाळा. आर्थिक बाबतीत परिस्थिती सामान्य राहील. अनावश्यक खर्च कमी करा. व्यवसायात अधिक मेहनतीची गरज भासेल. पती-पत्नींचे परस्पर सहकार्य आत्मविश्वास वाढवेल. अॅलर्जीचा त्रास जाणवेल.
धार्मिक कार्यक्रमातील सहभागामुळे मानसिक शांती लाभेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल, तर त्यावर गंभीरतेने विचार करा. कोणत्याही कागदोपत्री कामात अधिक दक्षता बाळगा. छोटी चूक मोठे परिणाम देऊ शकते. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. भागीदारीसाठी विचार करत असाल, तर ती यशस्वी ठरू शकते. घरातील वातावरण आनंदी राहील.
आज गरजू मित्राला मदत केल्याने तुम्हाला मानसिक शांती लाभेल. अभ्यास करणाऱ्या मुलांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर पुन्हा विचार करा किंवा ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्या. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात. पती, कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला कठीण काळातून बाहेर पडण्याचा आत्मविश्वास देईल.
श्रीगणेश सांगतात की, ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल कायम राहिल. सामाजिक क्षेत्रात तुमचा सन्मान वाढेल. आर्थिक अडचणीमुळे चिंता निर्माण होईल, पण ही समस्या थोड्याच काळासाठी राहील. या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. तुम्ही व्यवसायात काही नवीन सुरूवात करण्याचा विचार करत असाल, तर योग्य वेळ आहे.
श्रीगणेश म्हणतात की, आजच्या दैनंदिन जीवनात काही बदल घडवण्यासाठी तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवा. त्यामुळे आनंद मिळेल. कुटुंबात सकारात्मक बदल जाणवतील. कुठेही पैशांची देवाणघेवाण करू नका; तुमचे पैसे अडकू शकतात. तरुण वर्गाला एखाद्या मुलाखतीत यश न मिळाल्यामुळे निराशा वाटू शकते. कोणतेही व्यवसाय किंवा पैशांचे व्यवहार करताना योग्य कागदपत्रे तयार करा. पती-पत्नीच्या नात्यात वाद निर्माण होऊ शकतो.