Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज पैशांशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या; कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Horoscope 12 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामात उत्साह वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. आर्थिक व्यवहारात घाई टाळा.

वृषभ

वृषभ

वृषभ : महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मनमोकळा संवाद होईल.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवसायात लाभाची शक्यता आहे. प्रवासातून महत्त्वाची माहिती मिळू शकते.

कर्क

कर्क

कर्क : भावनिक निर्णय घेणे टाळा. कामातील अडथळे दूर होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने समाधान मिळेल.

सिंह

सिंह

सिंह : नोकरीत जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल.

कन्या

कन्या

कन्या : वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. पैशांशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. घरातील एखादा प्रश्न संवादातून सुटेल.

तूळ

तूळ

तूळ : भागीदारीच्या कामात फायदा होण्याची शक्यता आहे. खर्च वाढू शकतो. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण मिळतील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : अडचणींवर मात करून प्रगती साधता येईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. ताण कमी करण्यासाठी विश्रांती घ्या.

धनु

धनु

धनू : नवीन संधी येऊ शकतात. प्रवास किंवा नवीन प्रकल्पासाठी दिवस अनुकूल. उत्पन्न वाढवण्याचा मार्ग सापडेल.

मकर

मकर

मकर : कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता दिसून येईल. महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

कुंभ

कुंभ

कुंभ : रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. गुंतवणुकीत घाईघाईने निर्णय घेऊ नका.

मीन

मीन

मीन : संभ्रम दूर होऊन निर्णय घेणे सोपे जाईल. कामात यश मिळेल. आर्थिक लाभाचा मार्ग खुला होऊ शकतो. आनंदाची बातमी मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT