Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आज विश्रांतीचा दिवस लाभेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. मनावरचा ताण कमी होईल. मित्रांमुळे मानसिक शांतता मिळेल.
वृषभ : आर्थिक नियोजनासाठी चांगला दिवस. घरातील प्रश्न सुटतील. आनंदाची बातमी मिळू शकते. आरोग्य चांगले.
मिथुन : मन अस्थिर राहील. शब्दांची मोजदाद करूनच निर्णय घ्यावा. मित्रांचा सहवास लाभदायक ठरेल. झोपेची काळजी घ्या.
कर्क : कुटुंबात आनंदाचे वातावरण. भावनिक समाधान मिळेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मुलांचा अभिमान वाटेल.
सिंह : सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. जनमानसात आपली प्रतिष्ठा वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. उत्साह टिकून राहील.
कन्या : घरगुती कामात व्यस्त राहाल. कामाचा ताण कमी होईल. आरोग्य सुधारेल. सकारात्मक विचार ठेवा.
तूळ : जोडीदारासोबत क्वालिटी वेळ घालवाल. नातेसंबंध मजबूत होतील. आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल. मन प्रसन्न राहील.
वृश्चिक : भावनिक चढ-उतार जाणवतील. जुने प्रश्न डोके वर काढतील. संयम ठेवा. ध्यान उपयुक्त ठरेल.
धनु : नवीन योजना आखाल. भविष्यासाठी विचार सुरू होतील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. एकंदरीत आजचा दिवस उत्साहवर्धक आहे.
मकर : घरातील जबाबदाऱ्यांचा भार पडेल. आर्थिक बाबी नियंत्रित ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या. मानसिक शांतता राखा.
कुंभ : नवीन छंद जोपासाल. सर्जनशीलता वाढेल. मित्रांसोबत दिवस छान जाईल. आरोग्य ठीक राहील.
मीन : आध्यात्मिक विचार वाढतील. मन शांत राहील. तुम्हाला कुटुंबाचा आधार मिळेल. आत्मविश्वास वाढलेला दिसेल.