Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आज कामात गती येईल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
वृषभ : नवीन संधी मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. जवळच्या व्यक्तीशी मतभेद संभवतात. शांत राहून निर्णय घ्या. वरिष्ठ मदत करतील.
मिथुन : संवादातून कामे पूर्ण होतील. प्रवासाचे योग आहेत. मित्रांकडून मदत मिळेल. मन प्रसन्न राहील. नोकरदारांना बढतीची संधी मिळेल.
कर्क : कामात अडथळे येऊ शकतात. धैर्यान परिस्थिती हाताळा. घरात थोडा तणाव जाणवेल. आरामासाठी वेळ काढा. आरोग्य सांभाळा.
सिंह : आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना सुरू करू शकता. योजना यशस्वी होतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.
कन्या : कामात बारकाईने लक्ष द्या. चुका टाळण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाचा आधार मिळेल.
तूळ : नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. प्रेमसंबंधात प्रगती होईल. आर्थिक लाभ संभवतो. आनंदी वातावरण राहील.
वृश्चिक : गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात. कामात सावधगिरी बाळगा. तणाव वाढू शकतो. ध्यान-योग उपयोगी ठरेल.
धनु : प्रवासातून लाभमिळेल. कामात यश मिळण्याची शक्यता. मित्रांसोबत वेळ छान जाईल. नवीन कल्पना सुचतील.
मकर : जबाबदाऱ्या वाढतील. कामाचा ताण जाणवेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. कुटुंबाचा आधार मिळेल.
कुंभ : नवीन संधी मिळतील. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. मन प्रसन्न राहील. यशाची चिन्हे दिसतील.
मीन : भावनांवर नियंत्रण ठेवा. कामात लक्ष केंद्रित करा. जुने प्रश्न सुटतील. आर्थिक स्थिती स्थिर राहील.