Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आयुष्य मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा.
वृषभ : आर्थिक लाभहोतील. तुमचा मनमोहक स्वभाव, यामुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल आणि त्यांच्याशी संपर्क वाढवाल.
मिथुन : मुलांकडून धडा शिकायला मिळेल. मुले शुद्ध मनाची असतात. त्यामुळे भोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात.
कर्क : अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल.
सिंह : सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढेल. त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल.
कन्या : कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्र-मैत्रिणींना घेऊ देऊ नका.
तूळ : कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल.
वृश्चिक : अनेक ॐ माध्यमातून आर्थिक लाभहोतील. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो.
धनु : आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील; परंतु रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुमचे भांडण होऊ शकते.
मकर : प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.
कुंभ : वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल.
मीन : आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल.