Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 10 May 2026: आजचा दिवस ठरेल तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट? तुमची रास काय सांगते?

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष: लाभाच्या स्थानी चंद्र असल्याने अडकलेली कामे मार्गी लागतील. करिअरमध्ये मोठ्या संधी मिळतील आणि आरोग्य उत्तम राहील. लाभाचा दिवस.

वृषभ

वृषभ

वृषभ : व्यवसायात संयमाने निर्णय घेणे गरजेचे आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. आर्थिक परिस्थितीत दुपारनंतर सुधारणा होईल. रागावर नियंत्रण ठेवा.

मिथुन

मिथुन

मिथुन : नशिबाची पूर्ण साथ लाभेल. कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन आखाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना आनंदाची बातमी मिळू शकते.

कर्क

कर्क

कर्क : आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाचे विकार संभवतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे खर्चाचे नियोजन करा.

सिंह

सिंह

सिंह : जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. व्यवसायात नवीन भागीदार मिळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जीवनात तुमचा मान-सन्मान वाढेल.

कन्या

कन्या

कन्या : आज तुम्हाला परिश्रमाचे फळ मिळेल. गुप्त शत्रूपासून सावध राहा. कायदेशीर बाबींमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.

तूळ

तूळ

तूळ : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी दिवस योग्य आहे; मात्र तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : घरातील वातावरण आनंदी राहील. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. मानसिक समाधान लाभेल; मात्र आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

धनु

धनु

धनु : तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या पराक्रमाचे कौतुक होईल. लहान प्रवासाचे योग.

मकर

मकर

मकर : बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ

कुंभ

कुंभ : चंद्र स्वराशीत असेल, ज्यामुळे तुमची कल्पनाशक्ती वाढेल. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे. शारीरिक उत्साह टिकून राहील.

मीन

मीन

मीन : स्वतःसाठी वेळ काढणे कठीण जाईल. परदेश प्रवासाच्या दृष्टीने प्रयत्न करत असाल तर आज यश मिळू शकते. रात्रीच्या वेळी शांत झोप घेण्याकडे कल ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT