Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आज कामात उत्साह राहील. आर्थिक व्यवहारात घाई टाळा. कुटुंबातील व्यक्तीची मदत मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
वृषभ : महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन : नियोजनबद्ध काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रवासाची शक्यता. अनावश्यक खर्च टाळा.
कर्क : एखादे रखडलेले काम मार्गी लागेल. व्यवसायात लाभाची शक्यता आहे. कुटुंबातील मतभेद संवादाने सोडवा. आरोग्य सामान्य राहील.
सिंह : कामाच्या ठिकाणी प्रयत्नांचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. आत्मविश्वास वाढेल.
कन्या : महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. संयमाने परिस्थिती हाताळा. खर्च वाढण्याची शक्यता. कुटुंबाचा आधार मिळेल.
तूळ : प्रगतीची संधी मिळेल. नवीन ओळखी उपयोगी ठरतील. आर्थिक लाभ होऊ शकतो. जोडीदारासोबत चांगला संवाद राहील.
वृश्चिक : मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. वरिष्ठांकडून प्रशंसा होण्याची शक्यता. गुंतवणुकीत घाई करू नका. मानसिक ताण कमी होईल.
धनू : नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल. प्रवासातून फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
मकर : कामाचा ताण वाढू शकतो. आर्थिक व्यवहारात सावध राहा. कुटुंबासाठी वेळ काढल्याने मन प्रसन्न होईल.
कुंभ : नवीन संधी तुमच्यासमोर येतील. नोकरीत बदलाचा विचार पुढे सरकू शकतो. आर्थिक लाभाची शक्यता. आरोग्याची काळजी घ्या.
मीन : रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.