मेष : शारीरिक सुदृढतेसाठी मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. व्यापारात नफा होईल.
वृषभ : अमर्याद ऊर्जा आणि उत्साह सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधींचा योग्य फायदा घेऊ शकाल.
मिथुन : जबाबदारीमुळे दिवसभराचे वेत रखडतील, दुसऱ्यांसाठी बरेच काही कराल आणि स्वतः साठी काहीच करत नाही, हे कळेल.
कर्क : व्यस्त वेळापत्रकातही मन प्रसन्न राहील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल.
सिंह : द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
कन्या: काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे अस्वस्थ व्हाल; पण भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया देऊ नका.
तूळ : मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल, म्हणून संतुलित विचार करा.
वृश्चिक : संकल्पना चांगल्या त-हेने मांडल्यात आणि कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवली, तर फायद्यात राहाल.
धनु : आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. मन आणि हृदयावर प्रणयराधनेची धुंदी चढेल.
मकर : आर्थिकदृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. धन लाभही होऊ शकतो; पण यासाठी मेहनत करावी लागेल.
कुंभ : तुमच्या घरातील स्थितीचा काहीअंशी अंदाज बांधता येणार नाही. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल.
मीन : तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तीव्र दुःख देईल.