Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या व्यक्तींचा आज धाडसी निर्णय यशाकडे नेऊ शकतो; तुमची रास काय सांगते?

Horoscope 1 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : एखादी जुनी कल्पना नव्या रूपात यश देऊ शकते. अनपेक्षित भेट मन प्रसन्न करेल. आर्थिक निर्णय घाईत घेऊ नका.

वृषभ

वृषभ

वृषभ : कामात संयम ठेवल्यास अडथळे दूर होतील. जुना मित्र मदतीला धावून येईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे अधिक लक्ष द्या.

मिथुन

मिथुन

मिथुन : शब्दांपेक्षा कृतीचा प्रभाव अधिक पडेल. नवीन संधीचे दार अचानक उघडू शकते. प्रवासाचा योग. स्वतःवर विश्वास ठेवा.

कर्क

कर्क

कर्क : घरगुती वातावरण आनंददायी राहील. नोकरीत प्रगतीची चिन्हे दिसतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. आरोग्य सुधारेल. जोडीदाराशी सुसंवाद ठेवा.

सिंह

सिंह

सिंह : नेतृत्वाची दखल घेतली जाईल. महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता. प्रशंसेबरोबर मत्सर करणारेही भेटतील. संयम उपयोगी ठरेल.

कन्या

कन्या

कन्या : अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल. कौटुंबिक चर्चेत तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. नवीन कौशल्य शिकाल.

तूळ

तूळ

तूळ : संबंधांमध्ये गोडवा वाढेल. गैरसमज शांतपणे मिटेल. व्यावसायिक निर्णय लाभदायी ठरतील. मनातील ताण कमी होईल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : धाडसी निर्णय यशाकडे नेऊ शकतो. गुप्त योजना योग्य वेळीच उघड करा. आर्थिक लाभाची चिन्हे आहेत. रागावर नियंत्रण ठेवा.

धनु

धनु

धनू : नवीन अनुभव दिशा देईल. शैक्षणिक व बौद्धिक कामात प्रगती होईल. आनंदाची बातमी मिळेल. प्रवासात काळजी घ्या.

मकर

मकर

मकर : मेहनतीचे फळ मिळेल. जुना वाद मिटण्याची शक्यता. ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. नवीन योजना आखण्यासाठी योग्य वेळ.

कुंभ

कुंभ

कुंभ : सर्जनशील विचारांना उत्तम प्रतिसाद मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. संध्याकाळी आनंददायी बातमी मिळू शकते.

मीन

मीन

मीन : अंतर्मनाचा आवाज योग्य दिशा दाखवेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना संधी मिळेल. दिवस समाधानकारक राहील. कौटुंबिक आनंद वाढेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT